spot_img
spot_img

चिखली नगर परिषदेत सत्तासंघर्षाचा नवा अध्याय! 

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) नगर परिषदेत राजकीय कुरघोड्यांचा धडाका उडवत उपाध्यक्षा पदी शिवसेना (शिंदे गट)च्या वैशाली कपिल खेडेकर यांची निवड झाली आहे सत्ताधाऱ्यांनी ताकद दाखवत महत्त्वाच्या पदावर दावा ठोकला असताना विरोधकांची गणिते पूर्णपणे बिघडल्याचे चित्र दिसत आहे.

याचवेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित आणि सुरेंद्र ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपने थेट मैदानात उतरून आपली संघटनात्मक ताकद आणि सत्ता टिकवण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. नगर परिषदेत भाजपचा प्रभाव अधिक बळकट करण्याची ही खेळी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही माघार न घेता स्वीकृत सदस्य म्हणून प्रा. डॉ. निलेश गावंडे सर यांची निवड करून आपली उपस्थिती ठळक केली आहे. विरोधकही आता अधिक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!