बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेनेच्या कायदे विभागाला अधिक बळकटी देत संघटनात्मक आघाडीवर मोठी हालचाल घडली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी कायदे विभाग समन्वयक पदी अॅड. श्रीकांत जायभाये यांची नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्तीमुळे राजकीय व कायदेशीर वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार संजय गायकवाड यांनी ४ जानेवारी रोजी आपल्या मातोश्री संपर्क कार्यालयात जायभाये यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.
कायदे क्षेत्रातील अनुभव, आक्रमक भूमिका आणि संघटनात्मक कामगिरीमुळे अॅड. जायभाये यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या नियुक्तीने शिवसेनेचा कायदे विभाग अधिक सक्रिय, प्रभावी आणि लढाऊ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, संजय हाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बुलढाणा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची कायदेशीर ताकद वाढवणारी ही नियुक्ती राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार, अशी चर्चा रंगली आहे.











