मेहकर (हॅलो बुलडाणा) शहराच्या राजकारणात उद्या एक ऐतिहासिक क्षण नोंदवला जाणार आहे. उद्या ५ जानेवारी २०२६, सोमवार, सकाळी ९:३० वाजता मेहकर शहराचे प्रथम नागरिक, लोकनियुक्त व लोकप्रिय जननायक नगराध्यक्ष किशोर भास्करराव गारोळे हे आपल्या नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारणार आहेत. हा सोहळा केवळ औपचारिक नसून, मेहकरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
या भव्य पदभार स्वीकृती सोहळ्यास मेहकर–लोणार मतदारसंघाचे दमदार आमदार सिद्धार्थ खरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला दमदार वजन प्राप्त झाले आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेले किशोर गारोळे यांनी निवडणुकीतून जनतेचा स्पष्ट कौल मिळवला असून, आता तो विश्वास कृतीतून सिद्ध करण्याची वेळ आली आहे.
याच वेळी शिवसेना युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकही मेहकर नगरपरिषदेत आपापल्या पदांचा पदभार स्वीकारणार आहेत. एकसंघ, आक्रमक व विकासाभिमुख नेतृत्व शहराच्या सत्तेवर येत असल्याने मेहकरच्या राजकीय व प्रशासकीय समीकरणांत मोठा बदल घडणार, हे निश्चित आहे.मेहकरच्या जनतेसाठी हा दिवस नव्या आशा, नव्या संघर्ष आणि विकासाच्या नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे.











