spot_img
spot_img

खडकपूर्णा सिंचन प्रकल्पात मोठा घोटाळा उघड! बनावट अनुभव प्रमाणपत्रांवर 7.88 कोटींचे काम लाटले

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील खडकपूर्णा उपसा सिंचन योजना टप्पा क्र.२ मध्ये तब्बल 7 कोटी 87 लाख रुपयांचा जलसिंचन गैरव्यवहार उघडकीस आला असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिकांवर (क्र. 92/2012 व 83/2012) दिलेल्या आदेशानंतर झालेल्या उघड चौकशीत हा धक्कादायक भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला आहे.

मे. शेठ अॅन्ड सुरा इंजिनिअरिंग प्रा. लि., पुणे या कंपनीने निविदा मिळवण्यासाठी दोन बनावट पूर्व अनुभव प्रमाणपत्रे सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक विवेक मदनभाई सुरा यांनी निविदेच्या पूर्व अर्हता टप्प्यात पात्र ठरण्यासाठी ही बनावट कागदपत्रे वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चौकशीत आढळले की, प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या रकमेपेक्षा अनेक पटींनी वाढवून आकडे दाखवण्यात आले, जे सरळसरळ फसवणूक आणि दस्तऐवज बनावट करण्याचा गुन्हा आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, परभणी व जळगाव विभागांकडून करण्यात आलेल्या पडताळणीत प्रमाणपत्रांतील रकमेतील तफावत स्पष्ट झाली आहे. एका कामात प्रत्यक्ष 73.44 लाखांचे काम असताना तब्बल 348.74 लाख रुपये दाखवण्यात आल्याचे समोर आले. ही बाब म्हणजे सरकारी यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करून कोट्यवधींचे काम हडप करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम येथील पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल करत भा.दं.वि. कलम 465, 466, 471 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!