बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चहा आणि सिगारेट दिली नाही म्हणून वाद घालणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध अप क्र 376/2024 कलम 74, 75, 76, 296, 324(1), 333, 352, 351(2), 351(3), 3(5)BNS पुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना जळगाव जामोद येथील आहे.
फिर्यादी पिडीता रा. सेवकदास नगर, नांदुरा रोड जळगाव जामोद, यांचे दुकान आहे. या दुकानावर डॉ.गोविंद वानखडे,प्रतिक देशमुख व एक अनोळखी इसम आले होते. या तिन्ही आरोपींनी फिर्यादी यांचे घरी जावुन त्यांना चहा व सिगरेट मागितली असता फिर्यादी यांनी दुकान बंद झाले असुन सकाळी या.. असे दरम्यान आरोपींचे व्यसन त्यांना अस्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली व पुन्हा परत सकाळी 7 वाजता येवुन फिर्यादी यांना शिवीगाळ केली व धमकी दिली.पुन्हा दुपारी येवुन दुकानातील साहित्याची फेकाफाक केली. दरम्यान आरोपी डॉ.गोविंद वानखडेने फिर्यादीचा हात पकडुन साडी ओढली, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तीनही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्ह्यांची नोंद देखील झाली आहे.