बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भारतीय जनता पार्टीत जिल्हा उपाध्यक्ष उदय भास्करराव देशपांडे यांना पदमुक्त केल्याच्या चर्चांना त्यांनी जोरदार छेद दिला आहे. बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीशी संबंधित अपरिहार्य कारणांमुळे आपण अगोदरच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, असा स्पष्ट दावा देशपांडे यांनी केला. विदर्भ प्रांत संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर यांच्याकडे लेखी राजीनामा सादर करण्यात आला असून, त्याची प्रत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही पाठविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजीनामा आधीच दिल्यानंतर पदमुक्तीचा कांगावा हा जाणीवपूर्वक पसरवलेला अपप्रचार आहे, असा आक्रमक आरोप त्यांनी केला. पक्षात आपली भूमिका पारदर्शक असून, कुठल्याही प्रकारच्या शिस्तभंगाची कारवाई आपल्यावर झालेली नाही, असेही ते म्हणाले.











