बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासात मानाचे स्थान असलेल्या पेठेतील श्रीराम मारुती मंदिर संस्थानचा 114 वा वर्धापन दिन येत्या बुधवार, 31 डिसेंबर 2025 व गुरुवार, 1 जानेवारी 2026 रोजी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होत आहे. तब्बल शतकाहून अधिक काळ श्रद्धेचा दीप अखंड पेटवत असलेल्या या मंदिरात दोन दिवसीय भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शहरासह जिल्ह्यातील भाविकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
31 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता** श्रीगणेश पूजन व पुण्याहवाचनाने कार्यक्रमास सुरुवात होणार असून, सकाळी 11.30 वाजता अग्निस्थापन व हवन सुरू होईल. दिवसभर धार्मिक वातावरणात मंदिर परिसर भक्तिमय होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता प.पू. श्री प्रल्हाद महाराजांचे आगमन होणार असून, संध्याकाळी 6 वाजता उपासना संपन्न होणार आहे.
नववर्षाच्या पहाटे, 1 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजता श्रीरामराया व प.पू. महाराजांना रुद्राभिषेक, साधन द्वादशी व नैवेद्य आरती होणार आहे. दुपारी 12 वाजता पूर्णहुती, त्यानंतर 12.30 ते 2 या वेळेत महाप्रसाद होणार आहे.श्रीराम मारुती मंदिर संस्थानने सर्व भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक वर्धापन दिनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.











