बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पावसाळा सुरू झाला की, बिळात पाणी शिरल्याने ते रात्री, दिवसा- ढवळ्या डोके वर काढतात. त्यांना धक्का लागला की ते दंश देखील करतात. यात मग प्राणहानी सुद्धा होऊ शकते..होय! मनुष्याचा ते जीव घेऊ शकतात.. कारण ते असतात जहाल विषारी त्यांना कोब्रा असे संबोधले जाते.
साप म्हटल्यावर भल्या- भल्यांची भांबेरी उडते. असाच तीन फुटाचा भला मोठा विषारी कोब्रा जातीचा नाग 6 जुलै रोजी रात्रीच्या 10 वाजता अचानक सागवन येथील गजानन क्षीरसागर यांच्या साई नगरातील घरात अवतरला. श्री गजाननाची कृपा म्हणा की, गजानन यांचे नशीब बलवत्तर म्हणा.. ते थोडक्यात बचावले
झाले असे की, नेहमी प्रमाणे गजानन हे आपल्या झोपण्याच्या जागेवर जाऊन झोपत असताना, त्यांच्या बाजुला हालचाल झाली. दरम्यान काळजीपूर्वक पाहिले तर 3 फुट लांब अती विषारी नाग दिसून आला. यावेळी त्यांची भांबेरी उडाली. त्यांनी लगेच सर्पमित्र तथा
वन्यजीव संरक्षण व निर्सग पर्यावरण संस्थाचे अध्यक्ष एस.बि रसाळ
यांना फोनवरून संपर्क केला. त्यांनी शिताफिने साप पकडला व बरणीबंद करून आज वनविभाग च्या स्वाधीन करण्यात येईल असे सांगण्यात आले. दरम्यान
पावसाळ्यात साप आढळून शेतात किंवा घराच्या कानाकोपऱ्यात ते दडून बसलेले असतात.त्यामुळे काळजी घेण्यात यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.