बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर अखेर बुलढाणा पोलिसांनी वचक बसवला आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. श्रेणीक लोढा (खामगाव) व श्री. अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत आंतरजिल्हा चोरी टोळीचा पर्दाफाश केला आहे.
मा. पोलीस निरीक्षक श्री. सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने 27 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आलेल्या समांतर तपासात बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या Cr. No. 949/2021 (कलम 379 भादंवि) प्रकरणात मोठी प्रगती झाली. पोलिसांनी एकूण तीन आरोपींना ताब्यात घेऊन तब्बल चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या चार मोसा (वाहने) जप्त करण्यात आल्या आहेत.
ही चोरीची वाहने पोलीस स्टेशन बुलढाणा शहर, बोरखेडी तसेच नालासोपारा (मुंबई) येथून चोरीस गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये बुलढाणा शहरातील दोन, बोरखेडीतील एक आणि नालासोपारातील एका गुन्ह्याचा समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या धडाकेबाज कारवाईत PSI पंकज सपकाळे, HC दीपक लेकुरवाडे, HC एजाज खान, HC राजेंद्र अंभोरे, NPC अरविंद बडगे, PC अमोल शेजोल, PC अजीस परसूवाले, PC ऋषिकेश खंडेराव यांच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण व धाडसी भूमिका बजावली.











