spot_img
spot_img

💥EXCLUSIVE धुरंदर आमदार सिद्धार्थ खरातांची दमदार बॅटिंग! ‘मोठमोठे गार केले गंमत मधी’ – मेहकरमध्ये सत्तांतराचा इतिहास रचला

मेहकर (हॅलो बुलडाणा) नगरपरिषद निवडणुकीत धुरंधर आमदार सिद्धार्थ खरात यांनी केलेली राजकीय बॅटिंग थेट मैदानाबाहेर गेली आहे. एकतर्फी सत्ता प्रस्थापित करत त्यांनी मेहकरच्या राजकारणात नवा इतिहास रचला असून, या निवडणुकीत ते निर्विवाद किंगमेकर ठरले आहेत. विरोधकांची सर्व गणिते कोलमडवत, ‘मोठमोठे गार’ करत खरातांनी आपली रणनीती अचूक ठिकाणी साधली आहे.

नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले किशोर गारोळे यांनी भरघोस मतांनी ठासून विजय मिळवत जनतेचा स्पष्ट कौल आपल्या बाजूने वळवला. हा विजय केवळ व्यक्तीचा नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या ताकदीचा झाला आहे सामान्य घरातून आलेले, जमिनीवर काम करणारे आणि जनतेशी थेट नाळ जोडणारे गारोळे हे आज मेहकरच्या राजकारणातील नवे पर्व ठरले आहेत.

विशेष म्हणजे टीम ‘हॅलो बुलढाणा’ ने या अगोदरच निकालाचे निकष स्पष्ट केले होते, आणि तो अंदाज अक्षरशः खरा ठरला. युवकांचा चेहरा, दमदार नेतृत्व आणि कामाची स्पष्ट दिशा असलेले किशोर गारोळे यांच्या रूपाने मेहकरला ऊर्जावान नेतृत्व मिळाले आहे.या निकालाने मेहकरच्या राजकारणात सत्तेचा रंग बदलला असून, आमदार सिद्धार्थ खरात यांची ताकद पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!