spot_img
spot_img

जळगाव जामोदात जमीन हडप करण्याचा धक्कादायक प्रकार! ७७ वर्षीय विधवा शेतकरी महिलेची बनावट दस्ताद्वारे फसवणूक; ‘गायब करू’ची निर्लज्ज धमकी

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) जळगाव जामोद तालुक्यात ७७ वर्षीय विधवा, निरक्षर शेतकरी महिला धूपताबाई वानखडे यांची जमीन बनावट दस्त तयार करून हडप करण्याचा प्रकार उजेडात आला आहे. सावकारी करणारा निसार अलताफ मो. याच्यासह दोन साथीदारांवर 420, 468, 471, 504, 506, 34 या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धूपताबाई वानखडे यांनी दिलेल्या लेकीफिर्यादीत धक्कादायक तपशील समोर आले आहेत. उपचारासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी आपली शेती कायदेशीररीत्या सुरेखा म. वानखडे आणि अर्चना एम. तायडे यांना विकली होती. मात्र अचानक उपविभागीय अधिकाऱ्याकडून फेरफार रद्द करण्याची नोटीस मिळाल्यानंतर धूपताबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यांनी कधीही न पाहिलेल्या किंवा ओळख नसलेल्या निसार अलताफने त्यांच्या नावाने खोटा खरेदी दस्त तयार करून स्वतःला मालक दाखवण्याचा धूर्त डाव रचला होता.

निरक्षर असल्याचा फायदा घेत आरोपींनी संगनमताने बनावट सह्या व अंगठे तयार करून दस्त खोटा बनवला. एवढ्यावरच न थांबता, वृद्ध महिलेला धमकावत “हमने अफसर खरीद रखे हैं… तुझे और तेरे बेटे को गायब कर देंगे” असे म्हणत जीवदायिनी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!