चिखली (हॅलो बुलडाणा) जिल्ह्याच्या हरितक्रांतीला दिशा देणारे, पाणी संवर्धनाचे ध्वजवाहक आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारे जलपुरुषभारतभाऊ बोंद्रे (83) यांचं कालवश निधन ही अतिशय मोठी घटना ठरली आहे. त्यांच्या जाण्यानं जिल्ह्याचा एक जिद्दी, दूरदृष्टी असलेला आणि कठोर परिश्रमाने जनतेचा विश्वास जिंकणारा नेता कायमचा हरपला आहे.
वर्षानुवर्षांच्या अथक प्रयत्नांतून त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात जलसंधारणाची नवी क्रांती घडवली. शेकडो कोटी लिटर पाणी रोखणारी कामं, शेकडो गावांच्या भवितव्यात बदल घडवणारी योजनांची अंमलबजावणी हा त्यांचा खरा वारसा आहे. पावसाच्या थेंबाला सोन्यासारखं जपण्याची शिकवण देणारे भारतभाऊ हे जननेते होते, पदाने नव्हे तर कार्याने लोकांच्या मनावर राज्य करणारे.दरम्यान त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 5 वाजता जाफ्राबाद रोडवरील नानाशेठ बोन्द्रे यांच्या विटभट्टीजवळ पार पाडण्यात येणार आहे. हजारो कार्यकर्ते, शेतकरी, सामाजिक बांधव यांच्या उपस्थितीत एक महानायकाला अंतिम निरोप मिळणार आहे.














