चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) “जनतेचे दैनंदिन जीवनमान उंचावणे हेच माझे ध्येय,” असा ठाम निर्धार व्यक्त करत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार काशिनाथ बोंद्रे यांनी प्रभागनिहाय दौऱ्यांदरम्यान मतदारांशी आक्रमक संवाद साधला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य परिवर्तन घडवून आणण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक प्रभागात काँग्रेसच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या प्रचारसभा आणि कॉर्नर मीटिंगना प्रचंड जनसमर्थन मिळत असून, महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे वातावरण शहरभर दिसत आहे. विकासाभिमुख चर्चा, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याची हमी आणि बोंद्रे यांच्या कामाच्या विश्वासामुळे मतदारांचा झुकाव वेगाने आघाडीच्या बाजूने वाढत आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ बोंद्रे यांच्यासह १४ प्रभागांतील २८ उमेदवार विजयी होणार, अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात चिखली शहराचा कायापालट होणार, असा जनतेत ठाम विश्वास निर्माण झाला आहे.














