बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नगर परिषद निवडणुकीत आज राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. राज्याचे मुख्यमंत्री व भाजपचे शिरस्थ नेते मा. ना.देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीद्वारे बुलढाणा शहरवासीयांना थेट आवाहन करत, भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस–रिपाई (आठवले) आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्पिताताई विजयराज शिंदे यांना व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय मिळवून द्या अशी जोरदार हाक दिली. “बुलढाण्याला निधीची कमतरता भासू देणार नाही, नगरपरिषदेत कमळ फडकलेच पाहिजे,” असा खास संदेश फडणवीस यांनी दिल्याने शहराचे वातावरण अधिकच आक्रमक झाले आहे.
दरम्यान, राज्याच्या पर्यावरण मंत्री मा. ना. पंकजा मुंढे यांनीही लोणार येथील भेटीदरम्यान अर्पिताताई व मित्रपक्षांच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देत, “बुलढाणा विकसित शहर बनवण्यासाठी या उमेदवारांना जिंकवणे अत्यावश्यक आहे,” असे ठाम प्रतिपादन केले.
महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर निवडणूक प्रचाराला वेगळीच धार देत स्पष्ट घोषणा केली—“एक मत अर्पिताताईंसाठी म्हणजे प्रत्येक घराची मोफत मोजणी, अतिक्रमणाच्या टांगत्या तलवारीतून मुक्ती देणारी घराची प्रॉपर्टी कार्ड योजना आणि बुलढाण्याला 2000 नवीन घरकुले!” त्यांच्या भाषणाने प्रभागांमध्ये प्रचंड उत्साह उसळला.
यामुळे शहरात चर्चेला अक्षरशः उधाण आले असून “अर्पिताताई नगराध्यक्ष म्हणून निश्चित जाणार”असा विश्वास नागरिकांत दृढ होत आहे. तब्बल तीस वर्षांनंतर बुलढाण्यात भाजपचा नगराध्यक्ष बसणार, अशी चर्चा ज्येष्ठ नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.














