spot_img
spot_img

चिखलीकरांच्या मनात घोंगावतेय एकच भावना… ‘काशिनाथ आप्पा नगराध्यक्ष म्हणजे, आपण सर्व नगराध्यक्ष!’

चिखली (हॅलो बुलडाणा) महाविकास आघाडीच्या प्रचाराने शहरात अक्षरशः ऊर्जेचा स्फोट झाला असून, चिखलीकरांच्या मनात एकच संदेश जोरदार उमटताना दिसत आहे— काशिनाथ आप्पा बोंद्रे नगराध्यक्ष म्हणजे प्रत्येक नागरिक स्वतःच नगराध्यक्ष! ही भावना एवढी प्रबळ झालीय की सभागृहातून ते गल्लीबोळापर्यंत सर्वत्र तिचीच चर्चा आहे.

काशिनाथ आप्पांच्या साधेपणाचा, सर्वसामान्यांत मिसळून जाण्याच्या स्वभावाचा आणि अडचणीला तत्काळ प्रतिसाद देण्याच्या स्वभावाचा परिणाम म्हणून नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आत्मीयता निर्माण झाली आहे. “आप्पा जिंकले म्हणजे आमच्यातलाच माणूस नगराध्यक्षपदी!” अशी मुक्तपणे होणारी चर्चा त्यांच्याबद्दलचा जनविश्वास ठोसपणे अधोरेखित करते.

प्रचारसभांना उमटणारी प्रचंड गर्दी, प्रत्येक प्रभागातील संवादसभांमध्ये दिसणारा उत्साह, अनेक अपक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आप्पांना मिळत असलेले उघड समर्थन—या सर्व गोष्टींमुळे यंदाची लढत कोणत्या दिशेने झुकत आहे, हे स्पष्ट दिसू लागले आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारात दिवसेंदिवस वाढत असलेली जनसहभागाची लाट सत्तापक्षाच्या चिंतेत भर घालत आहे.शहरातील तरुणाई असो वा महिला वर्ग, सर्वांना वाटू लागले आहे की चिखलीचे भविष्य बदलायचे असेल, विकासाला नवी गती द्यायची असेल, तर नेतृत्व सक्षम आणि सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!