spot_img
spot_img

💥BREAKING अखेर रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या दांपत्याचा थरकाप उडवणारा शेवट! कार थेट विहिरीत – आत मिळाले पती-पत्नीचे मृतदेह!

नांदुरा (हॅलो बुलडाणा) तेलंगानाहून जळगाव-खान्देशकडे निघालेल्या पद्मसिंह पाटील आणि पत्नी नम्रता पाटील या दांपत्याचा शोध अखेर भीषण स्वरूपात लागला. वडनेर भोलजी परिसरातील एका बंद पडलेल्या, निर्जन विहिरीत ही कार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढली असता सर्वांची श्वासच रोखली कारच्या आतच पती-पत्नीचे निर्जीव, सडलेली स्थितीत मृतदेह आढळले!

हा साधा अपघात नाही, तर घातपाताची स्पष्ट शक्यता असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज. कारण विहीर बंद अवस्थेत, अंधारात आणि दुर्गम ठिकाणी असताना कार थेट आत कशी कोसळली? वाहनावरील ठसे, गाडीचा वेग, आसपासचे टायर मार्क्स—यांपैकी काहीच नेहमीच्या अपघाताशी जुळत नाही.

स्थानिकांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण असून, हा दुहेरी मृत्यू की योजनाबद्ध घात? याबाबत अनेक तर्क-वितर्क रंगू लागले आहेत.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास “संशयित मृत्यू” म्हणून सुरू केला असून गुन्हे शाखेची विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!