बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार कसा असावा? हे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या कार्य कर्तुत्वाने दाखवून दिले आहे. विविध विकास कामे करून नागरिकांना जिंकणारे आ. गायकवाड एकमेव आमदार ठरत आहे.
त्यांनी विद्यापीठ उपकेंद्र व मॉडेल डिग्री कॉलेजसाठी पहिल्या टप्प्यात 8 कोटी मंजूर करून घेतले आहे.
बुलढाणा विधानसभा मतदार संघात मागील अनेक वर्षांपासून रखडलेले मॉडेल डिग्री कॉलेज व विद्यापीठ उपकेंद्र प्रश्न आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाने मार्गी लागले आहेत. या इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील या क्रांतीमुळे बुलढाण्याचा शिक्षणाच्या दर्जा व बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीचे पाऊल पडत असल्याचे चित्र आहे.
शैक्षणिक स्तर वाढावा व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यात मॉडेल डिग्री कॉलेज व विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून केली जात होती.अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले मात्र त्यांनी यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे सदरचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून रखडलेला होता. बुलढाणा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आमदार म्हणून निवडून येताच त्यांनी अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लावले.