बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील सर्कुलर रोडवर आज रात्री अक्षरशः थरकाप उडवणारी घटना घडली. समोरून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने रस्त्यावरून गाडीवर चालत असलेल्या तीन ते चार नागरिकांना जबरदस्त धडक देत उडवले. या बेफाम आणि निष्काळजी वाहनचालकामुळे एका निरपराध नागरिकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात प्रशांत किसनराव जाधव (वय 47, रा. महावीर नगर, बुलढाणा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये अजय नरेंद्र खांडे (रा. महावीर नगर) याला डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून विशाल राजू आडेकर याच्या पाठीवर गंभीर मार लागला आहे. दोघांचाही उपचार जिल्हा रुग्णालयात सुरू आहेत.धडक दिल्यानंतर स्विफ्ट डिझायरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच भाजप शहराध्यक्ष व कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत जखमींची भेट घेतली व तातडीने योग्य उपचारांची मागणी केली














