बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात दर रविवारी भरत असलेल्या आठवडी बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत एक युवक सलग गाड्या चोरत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली होती. नागरिकांच्या तक्रारींनंतर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या अट्टल चोरट्यावर काटेकोर निगराणी ठेवत अखेर त्याला रंगहात पकडण्यात यश मिळवले.
आरोपी शिवाजी रामदास राठोड याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल सहा चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या आहेत. आठवड्याच्या बाजारात वारंवार होणाऱ्या या चोरीमुळे नागरिकांत भीतीचे सावट निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या जलद कारवाईमुळे आता नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड, तसेच एसडीपीओ सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मोरे आणि पीआय रवि राठोड यांच्या पथकाने केली.
दरम्यान, आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शहरातील चोरीच्या घटनांना चाप लावण्यासाठी केलेली ही धडक कारवाई सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.














