spot_img
spot_img

💥EXCLUSIVE डोंगरखंडाळा जमीन घोटाळ्यात नवा स्फोट! कायदे धाब्यावर? नियम मोडून 14 एकर व्यवहार – नेमका फायदा कुणाला? तारे परिवाराला न्याय मिळणार का?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील डोंगरखंडाळा गावात तब्बल 14 एकर शेती कंत्राटदार महेंद्र राऊत (छत्रपती संभाजीनगर) यांच्या नावावर नियमबाह्य पद्धतीने खरेदी झाल्याचा धक्कादायक आरोप आता चव्हाट्यावर आला आहे. तारे परिवाराच्या 28 एकर सामूहिक मालकीपैकी अर्धी जमीन संशयास्पद व्यवहारातून गायब झाली,अशी गंभीर चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.

या खरेदीवेळी अविभक्त हिसा घेताना इतर सहमालकांना नोटीस देण्यात आली का? पेपर प्रकटण झाले का? स्वतंत्र सातबारा निघाला का? खरेदीपूर्वी सर्च रिपोर्ट घेतला का? कर्ज निरंक करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली का? या एकाही प्रश्नाचे उत्तर आजवर कुणीच स्पष्ट दिलेले नाही.उलट या जमीन व्यवहारात अनेक कायदेशीर त्रुटी असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

जमीन व्यवहारात साधा शेतकरी कधीही भानगडीची, धोकादायक जमीन घेत नाही,हे सर्वश्रुत आहे. मग एवढ्या वादग्रस्त परिस्थितीत, अनेक कुटुंबांचा मालकी हक्क अडचणीत असतानाही,14 एकर जमीन खरेदी करण्याचे धाडस नेमके कोणाच्या जोरावर करण्यात आले? हा व्यवहार ‘रिस्क’ नसून ‘पाठबळावर’ घेतलेला निर्णय होता का? या प्रश्नांची चर्चा गावोगावी पेटली आहे.तारे परिवाराने या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी लढा सुरू केला आहे. दस्तऐवजांतील विसंगती, संशयास्पद वेगवान प्रक्रिया,नोटीस न पाठवण्याचे आरोप — सर्व मिळून हा संपूर्ण व्यवहार मोठ्या जमीन घोटाळ्याची दिशा दाखवत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

आता प्रशासन आणि महसूल विभाग हे गंभीर आरोप तपासणार का? दोषींवर कारवाई होणार का? डोंगरखंडाळा येथील हा जमीनप्रकरणाचा स्फोट बुलढाणा जिल्ह्यात नवीन भू-घोटाळ्याची सुरुवात तर नाही ना? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे.

क्रमशः

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!