spot_img
spot_img

💥दुदैवी! ‘ज्वाळा पेटत होत्या.. ती होरपळत होती!’ – पेटलेल्या कारमध्ये पतीने पाहिला गर्भवती पत्नीचा हृदयद्रावक मृत्यू!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नशिबात काय लिहिलं आहे? कुणालाच माहीत नाही! गर्भवती पत्नीला पेटलेल्या कार मध्ये होरपळत असताना पती पाहतोय..हा क्रूर नियतीचा डाव नाही का? काल पहूर गावाजवळ कारचा टायर फुटल्याने कार डिव्हायडर वर धडकली अन् झालेल्या अपघातात बुलढाणा तालुक्यातील कुलमाखेड येथील गर्भवती महिलेचा कोळसा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर ते जळगाव या महामार्गावर पहूर गावाजवळ ही घटना घडली आहे.मृतक ही सहा महिन्यांची गर्भवती होती. जानव्ही संग्राम मोरे (राजपूत)(21) असे मृतक महिलेचे नाव आहे.भुसावळ तालुक्यातील बोर्डी या माहेरातून जानव्हीला संग्राम हे कार मध्ये घेऊन येत असताना,पहूर- अजिंठा मार्गे कारच्यानक टायर फुटलेआणि संग्राम यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली.हा अपघात एवढा भीषण होता की,गाडीने पेट घेतला.दरम्यान नागरिक व वाहतूक पोलिसांनी संग्राम भोरे यांना कारची काच फोडून बाहेर काढले.मात्र कारमध्ये आणखी कोणी आहे का?याचे भान राहीले नाही.संग्राम यांनी आत पत्नी आहे हे सांगितल्यानंतर तात्काळ प्रयत्न करण्यात आला परंतु तो निष्फळ ठरला. संग्राम यांच्या डोळे देखत सहा महिन्याची गर्भवती पत्नी जळून कोळसा झाली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!