मेहकर (हॅलो बुलढाणा) शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये उसळलेल्या तुफान राड्याने नागापूर व डोणगाव परिसरात एकच खळबळ माजली आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर काठ्या, दगड, लोखंडी सळईने हल्ले चढवले. रक्त सांडून जमिन लाल झाली! थरार इतका वाढला की एकमेकांना रक्त भंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली.
या भीषण झटापटीत जागिर खान शब्बीर खान (४०), मोतीन बी (२४), इम्रान खान शब्बीर खान (३४), शबाना बी (४३), रखाना बी (३५)आणि रीधवाना बी (६०) यांसह अनेकांना गंभीर दुखापती झाल्या असून सर्वांना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी उसळली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतीच्या सीमावादातून पेटलेला हा वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मेहकर तालुक्यातील घटनाकड क्षेत्रणी शिवारातीलबहा प्रकार संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.














