बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात गर्भलिंग निदानासारख्या घृणास्पद आणि कायद्यानं बंदी घातलेल्या कृत्यात सहभागी असलेल्या डॉक्टरवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी धडक कारवाई करत पडदा फाडला आहे. अवैध गर्भलिंग चाचणीबाबत सतत येत असलेल्या तक्रारींवर अखेर जिल्हा प्रशासन जागं झालं आणि धाड टाकताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, एम.डी. नेचरोपॅथी डॉक्टर कैलास गवई यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली. तार कॉलनी, सुंदरखेड येथे त्यांच्या राहत्या घरातच हे अवैध गर्भलिंग निदान केंद्र गुपचूप सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. जिवंत लेकराचा गळा घोटणाऱ्या या विकृत व्यवसायाचा अड्डा घराच्या चार भिंतीत तयार केला होता, हे सत्य समोर येताच नागरिकांत संताप उसळला आहे.
महिला भ्रूणहत्येचा घातक खेळ रचणाऱ्या या डॉक्टरवर पोलिसांनी ताब्यात घेतले पुढील तपास वेगाने सुरू आहे. प्रशासनाच्या या कारवाईने अशा बेकायदेशीर रॅकेट्सना चपराक बसली असली, तरी आता कठोर शिक्षा आणि इतर अशा केंद्रांवर साखळी धाड हेच जनतेचे ठाम मागणे बनले आहे.घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड साहेब, उपविभागिय पोलीस अधिकार सुधीर पाटील साहेब चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे दाखल केला आहे














