spot_img
spot_img

14 एकर जमीन प्रकरणात स्फोटक वळण! OSD भंडारे यांची प्रतिमा काळवंडण्याचा रचलेला कट? गुन्हा दाखल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे विशेष कार्याधिकारी (OSD) सिद्धार्थ भंडारे यांच्यावर तब्बल 4.5 कोटी रुपये किंमतीची 14 एकर जमीन बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप करत राहुल मिनानाथ तारे यांनी पत्रकार परिषदेत स्फोटक खुलासे केले. या आरोपानंतर बुलढाण्यात तापलेलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.

मात्र भंडारे यांनीही पलटवार करत या आरोपांना थेट राजकीय कटकारस्थानाची शिक्कामोर्तब दिली आहे. ज्या जमिनीचा व्यवहार माझ्याशी थेट संबंधीत नाही, त्यात माझं नाव ओढून नियोजित बदनामी मोहिम राबवली जातेय, असा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की डोंगरखंडाळा (ता. बुलढाणा) येथील गट क्र. 175 मधील सदर जमीन त्यांच्या नातलगांनी कायदेशीररीत्या महेंद्र नारायण राऊत यांच्या नावावर खरेदी केली आहे. सातबारा उतारे आणि फेरफार नोंदी राऊत यांच्या नावावर असताना माझ्यावर आरोप करणे हे दुजोरा नसलेले राजकारण असल्याचे भंडारे यांनी ठणकावले.

भंडारे यांचा गंभीर आरोप 2 नोव्हेंबरला मंत्री शिरसाट यांच्या बुलढाणा दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर माझी प्रतिमा काळवंडण्यासाठी ठरवून हा डाव रचला गेला. मीडिया ग्रुपवर ‘OSD भंडारे यांनी 4.5 कोटींची जमीन हडपली’ असा खोटा मजकूर छापून मला सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.जर जमीन खरेदी बेकायदेशीर असेल तर कोर्टात जा! पण माझ्या नावावर चिखलफेक कराल तर मीही शांत बसणार नाही, असा संतप्त इशारा भंडारे यांनी दिला.या प्रकरणी भंडारे यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली असून क्रमांक 389/2025 दाखल करण्यात आला पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!