बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तब्बल 13 वर्षांपूर्वी म्हणजेच दि. २२ जून २०१२ रोजी नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. प्रशासनाच्या दबावाखाली दाखल केलेल्या गुन्ह्यांचा खटला न्यायालयात टिकू शकला नाही, असा थेट संदेश या निकालातून गेला आहे.
त्या दिवशी कारवाईला विरोध केल्याच्या कारणावरून रविंद्र देवीप्रसाद जैस्वाल आणि राजेंद्र देवीप्रसाद जैस्वाल यांच्यावर ३५३, ३३२, ३०९, ५०४ या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झाले. प्रथम न्यायालयाने शिक्षा ठोठावून आरोपींना गुन्हेगार ठरवले होते. मात्र हा निर्णय आव्हानात सत्र न्यायालयात उलथवून आरोपींची पूर्णपणे निर्दोष मुक्तता करण्यात आली.फौजदारी अपील क्र. २४/२०१६ वर न्या. कोर्ट क्र. ३ यांनी दि. ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी निकाल देत सरकारचा खटला फोल ठरवला. अॅड. अजय दिनोदे आणि अॅड. प्रवीण वाघमारे यांच्या तडाखेबाज युक्तिवादासह अॅड. रोहित दिनोदे, अॅड. अबुझर अन्सारी आणि अॅड. प्रियेश चौधरी यांचे मोलाचे सहकार्य ठरले.














