spot_img
spot_img

💥धक्कादायक! काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या ‘बेडरूम’ मध्ये घुसली पोलीस?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात मुक्कामास असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे. कारणही तितकंच धक्कादायक! शुक्रवारी सकाळी एका साध्या वेशातील पोलिसाने थेट त्यांच्या बेडरूममध्ये घुसून टेहळणी, चौकशी आणि नजर ठेवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण सपकाळांसाठी पहिल्यांदाच नव्हे तर तिसऱ्यांदा घडले आहे.

पत्रकार परिषदेत सपकाळांनी संतप्तपणे विचारले आम्ही दहशतवादी आहोत का? आमच्या बेडरूममध्ये पोलिस शिरतात, चौकशी करतात आणि म्हणतात वरिष्ठांचे आदेश आहेत. कोणत्या कायद्यानं हे अधिकार दिले? लोकप्रतिनिधींवरच पाळत ठेवायची? मग लोकशाहीचा अर्थ काय उरतो?

त्यांनी पुढे सांगितले की, सकाळी पोलिस थेट बेडरूममध्ये येऊन विचारत होता, तुम्ही पत्रकार परिषद घेणार का? पत्रकार आले का? त्यावर सपकाळांनी प्रश्न केला तुम्ही माझ्या खाजगी खोलीत का आलात? त्यावर पोलिसाने सरळ उत्तर दिलं.”वरिष्ठांचा आदेश आहे.”

सपकाळांनी सरकारवर तिखट टीका करत म्हणाले की, विरोधकांना गप्प बसवण्यासाठी आता त्यांच्या शयनकक्षातही घुसखोरी केली जाते. विरोधी भूमिका घेतल्यावर लगेच पोलिसी पाळत लावली जाते, ही लोकशाहीची नव्हे तर हुकूमशाहीची पहाट आहे.अब्रू, गोपनीयता आणि अधिकारांची पायमल्ली सहन केली जाणार नाही, असा इशाराही सपकाळांनी दिला. आता या गंभीर आरोपांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!