चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल)
चिखली शहराच्या मध्यभागी आज 12 वाजेच्या सुमारास अक्षरशः रणांगणच उभे राहिले! बोन्द्रे पेट्रोल पंप ते डीपी रोडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर थाटात उभ्या असलेल्या चिकन विक्री दुकानदारांमध्ये दुपारी साधारण 12 वाजताच्या सुमारास लाठ्या-काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली. काही क्षणात परिसरात आरडाओरडा, गोंधळ, आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही भांडणाची ठिणगी 28 ऑक्टोबर रोजी एका लग्न समारंभात लागलेल्या वादातून पेटली. त्याच वादाचे आज खुले रस्त्यावर हाणामारीत रूपांतर झाले. दोन्ही गटातील काही जण एकमेकांवर तुटून पडले आणि रस्त्यावर लोकांची झुंबड उडाली.दरम्यान, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील व त्यांची टीम घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.




















