spot_img
spot_img

💥BREAKING मोताळ्यात राजकीय भूकंप! गजानन मामलकरांचा काँग्रेसला रामराम!

मोताळा (हॅलो बुलढाणा) मोताळा तालुक्यात आज प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहे तालुक्याचे खंबीर व आंदोलनसम्राट म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गजानन मामलकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत पुन्हा एकदा सेनेचा झेंडा हातात घेतला आहे. आज दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मामलकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.हा प्रवेश सोहळा बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. आमदार गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन मामलकर पुन्हा सेनेत दाखल झाले. यावेळी गणेशसिंग राजपूत, प्रदीप जैन व इतर शिवसैनिकांची उपस्थिती होती.

गजानन मामलकर हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते असून, त्यांनी पूर्वी शिवसेना तालुका संघटक, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष, तसेच मोताळा तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांनी तालुका हादरवला होता.आता स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर असताना मामलकरांच्या सेनेत पुनरागमनाने मोताळा तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलणार आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!