चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली शहरात आज रात्री भीषण घटनेने खळबळ उडाली आहे! शहरातील राजा टॉवर ड्रायव्हर येथील प्रसिद्ध सीसीएन केबल नेटवर्कच्या कार्यालयाला रात्री सुमारे 9.40 वाजता अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे इन्व्हर्टरची बॅटरी फुटल्याने ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही क्षणांतच आगीने संपूर्ण कार्यालयाला वेढले आणि आत ठेवलेले संगणक, वायरिंग, केबल सेटअप, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनास्थळी अग्निशामक दल तात्काळ दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवला आहे











