spot_img
spot_img

💥BREAKING मृत्यूचा टिप्पर! रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या व्यक्तीस अक्षरशः चेंदून टाकले!रेती माफियांचा बळी ठरला निर्दोष नागरिक? पोलिसांचा पाठलाग सुरू!

चिखली (हॅलो बुलढाणा) दिवाळीच्या उत्साहात सारा जिल्हा आनंदात असताना, अमडापूर-चिखली मार्गावर आज संध्याकाळच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. रेतीने भरलेल्या एका टिप्परने रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीस अक्षरशः चेंदून टाकले. अपघात इतका भयंकर होता की मृत व्यक्तीचे शरीर पूर्णतः विद्रूप झाले असून, बॉडीचा अक्षरशः चंदामेंदा झाला आहे. घटनास्थळ पाहून नागरिकांच्या अंगावर काटा आला आहे.

साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, टिप्पर वेगात जात असताना रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या त्या व्यक्तीस धडक दिली आणि काही क्षणातच त्याला चिरडून पुढे निघून गेला. घटनास्थळी नागरिक मोठ्या संख्येने जमले असून, त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप मृतकाची ओळख पटलेली नाही.

या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी टिप्परचा पाठलाग सुरू केला आहे. वाहनाचा क्रमांक मिळाल्याची माहिती समोर येत असून, चालकावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ज्या घरात दिवे लागायला हवे होते, त्या घरात आता शोकाचे अंधार दाटले आहेत. प्रशासनाने अवजड वाहने आणि रेती वाहतूक नियंत्रणात आणण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!