spot_img
spot_img

💥हृदयद्रावक! मळणी यंत्रानं घेतला महिलेचा जीव! दिवाळीच्या आदल्या दिवशी शेतकऱ्याच्या घरात शोककळा

गोद्री/चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) दिवाळीच्या आनंदाच्या वातावरणात आज सायंकाळी पाचच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. गोद्री येथील ५० वर्षीय कांताबाई गुलाबराव कुटे या स्वतःच्या शेतात सोयाबीनची मळणी करत असताना भीषण दुर्घटना घडली. मळणी यंत्रात अचानक अडकलेले त्यांचे केस मशीनमध्ये ओढले गेले आणि काही क्षणांतच त्या यंत्रात गुरफटल्या गेल्या. घटनास्थळीच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही दुर्घटना आज सायंकाळी सुमारे पाच वाजता घडली. नातवंडांसह दिवाळी साजरी करण्याची तयारी असतानाच घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी तात्काळ कांताबाईंना बाहेर काढून चिखली येथील जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.दरम्यान, चिखली पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. शेतात काम करताना काळजी घेण्याचा सल्ला पोलिसांनी आणि प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!