बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीच्या घटना घडल्यात.यातील किती आरोपी मोकाट आहेत आणि किती जणांना बेड्या ठोकल्या? याची माहिती सध्या गुलदस्त्यात आहे.
पोलीस हा शासनाचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी त्यांना सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यांना अधिकार आहेत. पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत. परंतु त्यांचे जीवन खूपच असुरक्षित आहे. पोलीस हे कर्तव्य निष्ठ असतात. परंतु काही पोलीस वर्दीचा फायदा घेत गैर वर्तणूक करतात. या संदर्भात ‘हॅलो बुलढाणा’ बातम्या प्रकाशित करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही.’हाती पुरावा’ लागला की बातमी आलीच समजा, असा आमचा एक नियम झाला आहे. तो इतर मीडियानेही पाळावा. आमच्या प्रतिनिधींनी माहिती घेतली असता,बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत 1 जुलै 2023 ते जून 2024 दरम्यान विविध गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. 20 चोऱ्यांच्या घटनेने नागरिक भांबावले. यामध्ये घरफोडी,मोबाईल चोर, जनावरांची चोरी, शेती साहित्याची चोरींचा समावेश आहे. संतप्त बाब म्हणजे बलात्काराच्या 6 घटना घडल्या. या आरोपींना अटक करण्यात आले. एक खुनाची घटना घडली यातील देऊळघाट येथील आरोपीला अटक करण्यात आली.हाफ मर्डरची देखील एक घटना घडली आहे. वर्षभरातील गुन्हेगारीच्या घटनेवर ग्रामीण पोलीस स्टेशनचा चांगला वाचक राहिला आहे.