spot_img
spot_img

💥EXCLUSIVE ‘कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर दीड कोटींची डिफेंडर अन् कमिशन…’, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांवर भाजप नेत्याचे खळबळजनक आरोप!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आले आहेत. त्यांच्या नवे ‘रॉयल मूव्ह’ म्हणून तब्बल १.५० कोटी किमतीची लँड रोव्हर ‘डिफेंडर’ कार शहरात दाखल झाली असून, ही घटना सध्या सोशल मिडियासह स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

यावर प्रतिक्रिया देतांना भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी थेट संजय गायकवाडांवर खळबळजनक आरोप केले. शिंदे म्हणाले, “कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर दीड कोटींची डिफेंडर व कमिशन मिळालं आहे. ही चौकशी होणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, बुलढाण्यात महायुतीची टिकावासाठी नगराध्यक्षपदावर भाजपचा प्रबळ दावा आहे आणि या पायऱ्यांवरून युती शक्य आहे.

विजयराज शिंदे म्हणाले, “मतदारांना वेश्यांपेक्षा खराब म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला लोक नाकारतील, त्यामुळे भाजपचाच विचार व्हावा अन्यथा युती नाही.” शिंदे पुढे म्हणाले, बुलढाण्यात बेडकासारख भाषणातून युती पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीने काल दीड कोटी रुपयांची ‘डिफेंडर’ आणली. ती एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर असून ती कोणत्या कामाच्या कमिशनमुळे मिळाली आहे, याची चौकशी झाली पाहिजे. माध्यमांसमोर माहिती देतांना भाजपा नेते विजयराज शिंदे बोलले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, या राजकीय संघर्षामुळे बुलढाण्यात भाजप-शिंदे गट आणि शिंदे गटामध्ये तणाव वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. कारच्या बहुमूल्य खरेदीमुळे सुरुवातीला हलकेफुलके चर्चेचे स्वरूप असलेली घटना आता धक्कादायक राजकीय वादात रूपांतरित झाली आहे.सध्या स्थानिक राजकारणाच्या प्रत्येक हालचालीवर नागरिकांची नजर असून, आगामी महायुतीत कोण पुढे राहणार याची उत्सुकता वाढली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!