spot_img
spot_img

शिवसेना (शिंदे गटाला) आकाश दळवींचा‘अलविदा’! दळवी पुन्हा काँग्रेसमध्ये का? की नव्या पक्षाचा पर्याय शोधणार?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) युवा नेते आकाश दळवी यांनी थेट शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी मुंबईत शिंदे सेनेतर्फे आयोजित आढावा बैठकीत विदर्भातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते. यावेळी बुलढाणा शहराचे कार्याध्यक्ष आकाश दळवी सुद्धा पोहोचले आणि आपल्या पदाचा राजीनामा खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे सादर केला.

दळवी यांनी काँग्रेस सोडून फक्त दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ते शिवसैनिक झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी प्रभागात विकासकामे केली; परंतु, बुलढाणा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयार असताना, आमदार संजय गायकवाड यांच्याशी वाढलेला दुरावा राजीनाम्याच्या मागे कारणीभूत ठरला आहे.

मुंबईत बैठक दरम्यान खासदार जाधव आणि श्रीकांत शिंदे यांनी दळवी यांना राजीनामा मागे घेण्याचा प्रयत्न केला; परंतु, आकाश दळवी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. बुलढाणा मतदारसंघात आता राजकीय भूमिकांसाठी सर्वचत्रा लक्ष लागले आहे. दळवी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार की नव्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.राजकारणात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके फुटण्याची तयारी, प्रवेश, घरवापसी आणि राजीनाम्यांची शृंखला हे सर्व घडण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाणा शहरासाठी हा नवा राजकीय चढाओढ लवकरच ठळकपणे दिसणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!