बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलडाणा शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांचा वादांशी जवळचा संबंध राहिला आहे. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे आणि हिंसक कृतींमुळे त्यांच्यावर अनेकदा कायदेशीर कारवाई झाली आहे.आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टींनमध्ये शिळ्या अन्नावरून मोठा राडा घातला होता.कर्मचाऱ्यला बुक्के घातले होते. परंतू गायकवाड यांचा आरोप बिन बुडाचा निघाला व आता अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टीन मालकाला क्लीन चीट दिल्याचे समोर आले आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी पावसाळी अधिवेशनात आमदार निवासातील कँटिनमध्ये शिळं आणि निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत राडा घालला होता. या राड्यामुळे कँटिनचा परवाना रद्द झाला, तर सभागृहातही या प्रकरणाचे पडसाद उमटले होते.पण आता अन्न व औषध प्रशासनाने कँटिनला पूर्ण क्लीन चीट दिली आहे.आमदारांनी थेट कँटिन चालकाला मारहाण केली होती, आणि ‘निकृष्ट अन्न’ या आरोपाने परिसरात हाहाकार माजला. मात्र, तपासानंतर अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कँटिनमध्ये कोणतेही अवैध किंवा निकृष्ट पदार्थ नव्हते. या निर्णयाने आता समाजात आणि व्यापारी क्षेत्रात चर्चेला पेव फुटले होते.आमदारांच्या राड्यामुळे कँटिनचा व्यवसाय थांबवण्यात आला होता.अजिंठा कॅटर्सला दिलेल्या परवान्यावरून बेकायदेशीर कारवाई करण्यात आली, परंतु महिन्याभरातच ती मागे घेतली गेली. यामुळे आता चर्चा सुरु आहे की, आमदारांनी कोणत्याही आधाराशिवाय कँटिनला बदनाम करून राडा केला.
विधानसभेतही या प्रकरणावर चर्चा झाली, तर विधानसभा अध्यक्षांकडून कारवाईचे आदेश देण्यात आले होते. अन्न व औषध प्रशासनाने तरतुदींचे उल्लंघन नोंदवत कारवाई केली होती. पण आता ती कारवाई मागे घेण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.तत्पूर्वी वाघाची शिकार केल्याचे आणि वाघाचे दात गळ्यात घातल्याच्या विधानावरून त्यांच्यावर वन विभागाने गुन्हा नोंदविण्यात आला होता.शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी यावर रान उठवले असता त्यांनी गळ्यातील वाघनखे प्लास्टिकचे असल्याचे स्पष्ट केले होते.











