बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांना वेठीस धरल्या जात असल्याचा प्रकार अनेकदा उजेडात आला. या धक्कदायक प्रकाराचा धुराळा खालीच बसला. वाहतूक पोलिसांकडून काळीपिवळी आणि इतर खासगी वाहन धारकांकडून ‘हप्ता’ वसुली केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव एका व्हिडिओ मार्फत समोर आले आहे. याबाबत एका पक्षाने तक्रार देखील केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वाहतूक शाखेतील कर्मचारी वसूलीसाठी जबाबदार नाहीत तर अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत. कर्मचाऱ्यांना टार्गेट दिल्या जाते. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला जातो. हे प्रत्येकांना समजते परंतु मोठे मासे अडकत नाही तर लहान माशांना कधीकाळी नोकरी पासून हात धुवावा लागतो.
वाहतूक शाखा शाखेतील कर्मचारी आपला कर्तव्य विसरून फक्त “वसुली” करीत असल्याचा आरोप नेहमी होत असतो.आता तर बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेतील 2 कर्मचारी “गोत्यात” आले असून समाजवादी पार्टीने त्यांच्यावर अरेरावी व दादागिरी करण्याचा आरोप करीत लेखी तक्रार केली आहे.तसेच पैसे घेतानाचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे.समाजवादी पार्टीचे जळगाव जामोद शहर अध्यक्ष सय्यद नफीस यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेतील दोन्ही कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करून वाहनधारकावर दादागिरी व दमदाटी करतात,इतकेच नव्हे तर “ऑन-ड्युटी” दारूच्या नशेत असतात. वाहनधारकांना नियमांचा धाक दाखवून दंड आकारण्याच्या नावावर अवैध वसुली करतात.याच दोन कर्मचाऱ्यांचा वाहनधारकांकडून पैसे घेण्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.याप्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेतील त्या कर्मचारी यांच्याविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपण तक्रार केली असून त्यांना निलंबित करण्याची मागणी केल्याची माहिती सय्यद नफीस यांनी दिली आहे.