बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्कुल बसचे नियम दिवाळीनंतर कडक करण्यात येऊन नियम पायदळी तुडविणाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा उगारल्या जाईल, असे आरटीओ रघुवीरसिंग बिलावर यांनी प्रसारमाध्यमां समोर स्पष्ट केले आहे.विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या कडे परमिट नाही… ॲपेच्या साईडला दप्तर लोंबकळतात..
कर्णकर्कश हॉर्न वाजविल्या जाते, अशी माहिती समजली. त्यामुळे दिवाळीनंतर कडक कार्यवाही केली जाणार, असा इशारा
आरटीओ रघुवीरसिंग बिलावर यांनी दिलाय.बुलढाणा जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या नियमावलीत जे नियम आहे, त्याच्या एकाही तरतुदीचे पालन होत नाही. यामध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन व चालक यांची पात्रता पाहिली, तर कोणालाच ही वाहतूक करण्याचा परवाना मिळू शकणार नाही, अशी स्थिती आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करणार्या वाहनांतून विद्यार्थी संख्येची क्षमता महाराष्ट्र मोटार वाहन नियम 106 नुसार 12 वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना 2 आसन क्षमता असणार्या सीटवर 3 विद्यार्थी व तीन आसन क्षमता असणार्या वाहनात चार विद्यार्थी इतकीच आहे. प्रत्यक्षात रिक्षात 12 ते 15 विद्यार्थी कोंबले जात आहेत. वर्षानुवर्षे ही वाहतूक कशी सुरू राहते, हा मोठा प्रश्न आहे.
▪️आमची कारवाई सातत्याने सुरूच!
स्कूल बस नियमावलीबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांची सातत्याने तपासणी सुरू आहे.- रघुवीर बिलावर, आरटीओ, बुलढाणा
▪️स्कूल बस कशी असावी?
वाहनाच्या पुढे व मागे शालेय विद्यार्थ्याचे चित्र असलेला 350 बाय 350 चा बोर्ड रंगवून घ्यावा.स्कूल बस असे लिहिलेले असावे.
वाहनाच्या दर्शनी भागावर शाळेचे नाव व त्या वाहनाचा मार्ग क्रमांक लिहिलेला असावा.
धोक्याचा इशारा देणारे इंडिकेटर्स बसवणे आवश्यक आहे. हे स्वयंचलित असावे.
वाहनाला प्रेशर हॉर्न बसवू नये.
वाहनाची संपूर्ण बांधणी लोखंडी धातूची असावी व सर्व बाजू धातूंनी बंद असाव्यात.
आसन क्षमता व मान्यता शासन निश्चित करेल.
वाहनाची बांधणी बस बॉडीची रचना नियमाप्रमाणे असावी.वाहनचालकाची पात्रता वाहन चालकास 5 वर्षे बस चालवण्याचा अनुभव व तो बॅचप्राप्त प्रशिक्षित असावा.
निर्व्यसनी, निरोगी वैयक्तिक स्वच्छता, टापटीपपणा व शुद्ध चारित्र्य असणारा असावा.
वाहनचालकाने प्रवासी वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे.
प्रथमोपचार व अग्निशमनाचे प्रशिक्षण प्राप्त असावा.
▪️वाहनचालकाचे कर्तव्य!
वाहनाची दैनंदिन देखभाल करावी.
वाहनाचे डॅशबोर्डवरील सर्व मीटर कार्यरत असल्याची खात्री करावी. वाहनाची इंधन गळती, ब्र्रेक कार्यक्षमता, टायर्सची स्थिती नियमित तपासावी. बस लेनमधूनच प्रवास करावा.विद्यार्थ्यांची संख्या नोंदणीकृत क्षमता महाराष्ट्र मोटार वाहन नियम 106 मध्ये विहीत केल्याप्रमाणे 12 वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना 2 आसन क्षमता असणार्या सीटवर 3 विद्यार्थी व 3 आसन क्षमता असणार्या वाहनात 4 विद्यार्थी.वाहनात विद्यार्थ्यांनी विसरलेले सामान शाळेमध्ये जमा करावे.योग्य थांब्यावर व शाळेतील आवारात विद्यार्थी वाहनात घेणे व उतरवणे.परिचर (मदतनीस) आवश्यक
प्रत्येक वाहनात परिचर (मदतनीस) असणे बंधनकारक आहे.जर वाहनात विद्यार्थिनी असतील, तर महिला परिचर (मदतनीस) असणे बंधनकारक आहे.विद्यार्थ्यांना उतरताना किंवा चढताना व रस्ता पार करताना वाहतुकीचे नियम पाळून मदत करणे.