बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर शुभेच्छा संदेश दिला आहे. शासनाने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत जिल्हा प्रशासन ताकतीने दिवाळीपूर्वी पोहोचवील, अशी ग्वाही देखील पाटील यांनी दिली आहे.
जून-जुलै- ऑगस्ट या तीन महिन्यात दोन लाख बारा हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 152 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत तात्काळ मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे.शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आधार कार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्र सेतू केंद्र किंवा नजीकच्या तहसील कार्यालयात सादर करावे,जेणेकरून त्यांना नैसर्गिक आपत्तीची रक्कम जमा करता येईल,असेही जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सांगितले आहे.