बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एलसीबीने मोठी कारवाई करत शहरातील एका घरात कुंटणखाना चालवणाऱ्या ‘आंटी’वर कारवाई केली आहे. घरात सुरु असलेल्या कुंटणखाण्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यामुळे स्थागुशाच्या पोलिस पथकाने रविवारी सायंकाळी छापा मारत ही कारवाई केली आहे. दरम्यान यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत एका आंटीला ताब्यात घेऊन, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
एक महिला पैशाचे आमिष दाखवून बाहेरगावाहून अर्थात जबलपूर व भिलाई येथून महिलांना बोलावून घेत आपल्या राहत्या घरातच देहविक्री व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती.या कुंटणखान्यातून बक्कळ पैसा मिळविण्याचा उद्देश होता.गुन्हे शाखेच्या पथकाने पंचनामा केला असून, साक्षीदारांच्या अहवालानुसार कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेवर व ग्राहकाविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.