spot_img
spot_img

सिटी न्यूज कार्यालयातील भ्रमणध्वनी खणखणतोय! -भ्रष्टाचारी सीएस निलंबित झाल्याने अभिनंदनचा वर्षाव! -सिटी न्यूज च्या पाठपुराव्याला आले यश

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी शासनाच्या पैशांचा अपव्यय केला. ही रक्कम कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे.ना. प्रतापराव जाधव यांनी या भ्रष्टाचारा संदर्भात प्रश्न उचलल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. पाठपुराव्यामुळे मुळे ‘सिटी न्यूज’ च्या कार्यालयात दूरध्वनी द्वारे अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

विशेष म्हणजे ‘सिटी न्यूज’ ‘दैनिक जनसंचलन’ व ‘हॅलो बुलढाणा’ ने वृत्तमालिका रेटल्याने हा परिणाम दिसून आला. आतापर्यंत चार जण निलंबित झालेत आणखी दोषींची मोठी यादी लवकरच सिटी न्यूज, हॅलो बुलढाणा उजागर करणार आहे. दरम्यान या वृत्त मालिकेच्या यशानंतर सिटी न्यूज च्या कार्यालयात सकाळपासून भ्रमणध्वनी ची घंटा वाजत आहे. शुभेच्छांचा व अभिनंदननाचा वर्षाव होत आहे. हे यश जनसामान्य लोकांचे असून, सिटी न्यूज वृत्तवाहिनी, किंवा दैनिक जनसंचलन,हॅलो बुलढाणा न्यूज पोर्टल हे नागरिकांच्या समस्या उजागर करून नागरिकांना न्याय देण्याचे एक माध्यम असल्याचे संचालक जितेंद्र कायस्थ यांनी स्पष्ट करून अभिनंदनकर्त्यांचे आभार मानले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!