बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भारताचे सरन्यायाधीश मा.भूषणगवई यांच्या अवमान प्रकरणी येथील गांधी भावनात महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात देखील निदर्शने करण्यात आली.सरन्यायाधीश मा.भूषण गवई
यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यवाही दरम्यान एक माथेफिरू वकील राकेश किशोर याने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून, भारतीय न्यायव्यवस्था, संविधान, सामाजिक न्याय व लोकशाही मूल्यांवरच थेट प्रहार असल्याचा महाविकास आघाडीने आरोप केला आहे. या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने गांधी भवन, बुलढाणा येथे धरणे आंदोलन केले.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्रजी खेडेकर, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंधरभाऊ बुधवत, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शामभाऊ उमाळकर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजितजी पाटील, नरेशभाऊ शेळके यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.














