बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागताच बुलढाणा शहरात राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. नगराध्यक्षपद महिला ओपन प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुक महिलांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. मात्र, या साऱ्या चर्चांमध्ये एकच नाव सध्या शहराच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे ‘कोमलताई झंवर’!
आशिया खंडात नावाजलेली सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेली बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सो लिमिटेड व सहकार विद्या मंदिराची यशस्वी अध्यक्षा, सहकार महर्षी राधेश्याम चांडक (भाईजी) यांची कन्या आणि सातसमुद्र पार आपल्या कौशल्याने बँकेचे नाव नेणारे बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष सुकेश झंवर यांच्या सुविद्य पत्नी म्हणून परिचित असलेल्या कोमलताईंचा जनसंपर्क आणि कार्यपद्धती अद्वितीय आहे. त्यांची शांत पण प्रभावी शैली, निर्णयक्षमता आणि सर्वसमावेशक विचारधारा हीच त्यांची खरी ताकद आहे.
आई पुष्पाबाई चांडक यांच्या 2001 ते 2005 पर्यंतच्या कार्यकाळात बुलडाणा शहरात विकासगंगा आणून शहराचा चेहरा मोहरा बदलणारे महिला नगराध्यक्ष यांच्या कार्यकाळात झालेला विकास आजही बुलढाण्यात पावलोपावली जाणवतो. त्याच वारशाला नवी झळाळी देण्यासाठी कोमलताई झंवर सिद्ध होत असल्याचे शहरातील सुज्ञ नागरिक खुलेपणाने सांगू लागले आहेत.
कोमलताईंमध्ये नेतृत्वाची ताकद, लोकसंपर्काची खोली आणि विकासाची स्पष्ट दृष्टी आहे. बुलढाण्याच्या सर्व जाती, धर्म, समाजाला चालणारा असा एक चेहरा म्हणजे कोमल झंवर कोमलताईंनी निवडणूक लढवावी हा शहरातील जनतेचा सूर बनू लागला आहे.बुलढाण्याचा कायापलट घडविण्याची क्षमता, महिलांना पुढे नेण्याची प्रेरणा आणि सर्व समाजाच्या विकासाचा ध्यास घेणारे हे नेतृत्व लवकरच शहराच्या राजकारणात मोठी लाट निर्माण करणार हे नक्की!