spot_img
spot_img

💥बुलढाणा मतदार यादीत बोगस मतदार? – भाजपाचा आक्षेप,सह पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश! – राजकीय वर्तुळात खळबळ!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक मतदार यादी कार्यक्रम २०२५ अंतर्गत मतदार यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही स्थानिक पातळीवर प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार याद्या आगामी निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.मात्र या यादीवर दस्तूरखूद्ध भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे व भाजपचे शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी आक्षेप नोंदवून पालिका आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.

त्यांनी बोगस व पुनरावृत्ती झालेले मतदार वगळण्याची मागणी सहपालकमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी किरण पाटील
यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार निवेदनाची दखल घेत सहपालक मंत्री सावकारे यांनी जिल्हाधिकारी यांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहे. तक्रार निवेदनात नमूद केले आहे की, बुलढाणा विधानसभा मतदार संघातील जवळपास ३५४६ मतदार हे पुन्हा पुन्हा नोंदणी केलेले आहे, त्याच प्रमाणे बुलढाणा शहरातही जवळपास ८०० मतदारपुन्हा पुन्हा नोंदणी केलेली आहे.काही मृतकांची नावे आजही मतदार यादीत समाविष्ट आहे. सदर पुनरावृत्ती झालेले मतदान हे

निर्णायक स्वरूपाचे ठरू शकते, राजकीय हस्तक्षेप करून ही नावे हेतू पुरस्कर पुन्हा नोंदवली गेली आहे या नावांचे बारकाईने
निरीक्षण केल्यावर नाव, वय,पत्ता व यादी भाग क्रमांक यामध्ये खूप समानता आढळत आहे. अश्या बोगस मतदारांची यादीच पुराव्या निशी जोडून जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार
चव्हाट्यावर आणला असा प्रकार संपूर्ण यादीत मोठ्या स्वरुपात झालेला दिसून येत आहे.
अश्या बोगस व मृत मतदारांना मुळे निवडणुकांची पारदर्शकता व विश्वासार्हता कमी होत असून आदर्श आचार संहितेचा भंग होणार आहे.अशी पुनरावृत्ती झालेली व मृत मतदारांची नावे तात्काळ स्वरूपात बीएलओ मार्फत स्थळ निरीक्षण करून वगळण्यात यावी.त्या बाबतचा शिक्का त्या नावांवर मारून अद्ययावत याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केलीे आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!