बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विविध समस्येत अडकलेल्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लाज सोडलेला गब्बर डॉक्टर भ्रष्टाचाराने बरबटला असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. सुभाष चव्हाण असे या सीएस चे नाव असून, त्यांना मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रश्न उचलल्याने निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे ‘सिटी न्यूज’ ‘दैनिक जनसंचलन’ व ‘हॅलो बुलढाणा’ ने वृत्तमालिका रेटल्याने हा परिणाम दिसून आला. आतापर्यंत चार जण निलंबित झाले आहेत आणखी दोषींची मोठी यादी लवकरच उजागर होणार आहे.
बुलढाणा शहराचे नाव तसे मोठे परंतु येथे खोटे-नाटे चालत नाहीत. त्यांचा भांडाफोड होतोच. कारण मीडिया सजग आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचार,अस्वच्छता नेहमीच पाहायला मिळते. सी एस सुभाष चव्हाण यांच्या कार्यकाळात नियमबाह्य कामांच्या प्रकरणाचा पाठपुरावा सिटी न्यूज ने केला असता,आता पर्यंत 3 अधिकाऱ्यांसह 1 जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित झाला आहे.
या पूर्ण प्रकरणात मोठी साखळी असून अजूनही काही दोषींवर फोजदारी दाखल करण्याचे आदेश जारी झाल्याची सूत्रांकडून अधिकृत माहिती मिळाली आहे. या प्रकरणात तोआदेश दाबण्याचा जो कोणी अधिकारी प्रयत्न करीत असेल त्यावर ही कडक कारवाई होणे गरजेचे आहे. यावर ‘सिटी न्यूज’ ‘हॅलो बुलढाणा’ चा वॉच आहेच! आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यावधीचा मलिदा लाटणारे अठराळे, कुलकर्णी, प्रकाश बोथे व आता जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांचे निलंबन झाले आहे.
आमचा पाठपुरावा या भ्रष्टचाऱ्या विरोधात लढा असाच सुरू राहणार