बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आशिया खंडातील यशस्वी मान्यवर भाईजी यांचा आज अमृत महोत्सव आणि डॉ. सुकेश झंवर यांचा सुवर्ण महोत्सव असून सहकार विद्या मंदिराचा रोप्य महोत्सव साजरा होत आहे.त्यामुळे तीन पर्व ऋणानुबंधांचे थाटात साजरे होत आहे. शिक्षणाची नाळ,सुखवायाला काळ…’विद्यामंदिराची!’-‘सुवर्ण महोत्सवी पर्वावर प्रगतीच्या लाटा..गौरवशाली व्यवस्थापनाचा वाटा.. सुकेशजींचा! आणि सहकाराची आस,विकासाचा ध्यास..’नित्य स्फूर्तीजन्य अमृत महोत्सवी चैतन्य भाईजींचे!’असे ब्रीदवाक्याने अनेकांनी यांचे आज स्वागत करून आशीर्वाद घेतले.
खरे तर स्वप्न हे स्वप्न असतात कुणी बंद डोळयांनी तर कुणी उघड्या डोळ्यांनी पाहतात. बंद डोळ्यांची स्वप्न कल्पनात्मक असतात तर, उघड्या डोळ्यांची स्वप्न वास्तवात साकारावी लागतात…असेच उघड्या डोळयांचे स्वप्न आदरणीय भाईजींनी पाहिले ते म्हणजे सुसंस्कृत समाज आणि आर्थिकदृष्टया सबल झालेला समाज स्वप्नपुर्तीसाठी हातात बळ असावं लागतं, दूर दृष्टीकोन ठेवून, धोरण आखावं लागतं आणि आखलेल्या धोरणानुसार कार्य करावं लागतं.
अशाच प्रकारे आदरणीय भाईजींनी आखले. आपल्या स्वप्न पुर्तीच्या कार्याला प्रारंभ केला तो डोंगरखंडाळा या त्यांच्या स्वतःच्या गावातून केवळ बारा हजार भांडवलावर एक छोटीशी पतसंस्था स्थापन केली. तिचे नाव बुलडाणा अर्बन क्रेडीट सोसायटी! यापतसंस्थेचा इतका विकास झाला की, ही संस्था पूर्ण भारतभर पसरली आहे. तिची किर्ती आज विदेशातही आहे.आज ही संस्था अनेक गरीब कुटूंबाला पोसते अनेक गरीब शेतकर्यांना सहारा देते. व्यापार्यांना ही आर्थिक मदत करते. त्यामुळे समाजातील लोक आर्थिक दृष्टया सबल झाले आहेत. लोकांना या संस्थेमुळे रोजगार मिळावा आहे. आज बरेच कुटूंब सन्मानाने जगत आहेत आणि आर्थिकदृष्टया सबल समाजाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य बुलडाणा अर्बन क्रेडीट सोसायटीच्या साह्याने केले. तसेच सुसंस्कृत समाजाचे स्वप्न पुर्तीसाठी त्यांनी मसहकार विद्या मंदिरची स्थापना केली.
मोठमोठया शहरातील मुले सर्व सुखसोयीमुळे शिक्षीत होतात. खेळाडू, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनिअर होतात. पण ग्रामीण भागातील मुलांना ह्या सुख सोयी व शिक्षणाची माध्यमे उपलब्ध नसल्यामुळे मागे राहतात हे भाईजींना कळले होते म्हणून खेडे विकसित झाले तरच समाज विकसित होईल हे आदरणीय भाईजींनी ओखळले आणि सहकार विद्यामंदिरची स्थापना केली. ज्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता येईल.
त्यांच्या या कार्याने आता ग्रामीण भागातील मुले इंग्रजी बोलतात, इंग्रजी वाचतात व लिहितात तसेच सहकार विद्यामंदिर मध्ये फक्त इंग्रजी शिक्षणच न देता आपल्या संस्कृतीची जोपासना केली जाते. श्लोक, धार्मिक, उपक्रम राबवले जातात जसे कृष्णजन्माष्टमी गणेशजयंती, शिवजयंती अशाप्रकारे अनेक कार्यक्रम घेऊन विविधस्पर्धा, स्नेहसंमेलन, क्रिडास्पर्धा होतात त्यातून विद्यार्थ्यांचा बौध्दीक, शारीरिक व मानसिक विकास होतो. आणि पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्या समाजाला सहकार विद्या मंदिर सुसंस्कृत करण्याचे कार्य करत आहे.
विशाल पर्वतापरी कार्य तुमचे नदिपरी निरंतर वाहणारे अखंड कार्यरत राहून समाज विकास करणारे… या सोबतच त्यांनी समाज सेवेकरिता अनेक उपक्रम राबवले आहेत. जसे की सुतगिरणीच्या माध्यमाने कापड व्यवसाय देऊन रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. गोरक्षणाच्या कार्यातून गायींचे रक्षण करण्याचे कार्य केले आहे. गुरुकुलची निर्मिती करुन वेद पुराणाचे नाव विद्यार्थी शिकत आहे.
खरोखरच भाईजी म्हणजे समाजप्रिय समाजाचा सतत विचार करणारे, समाज उपासक आहेत. म्हणून मला म्हणावं वाटतं, समाजाचा शिरोबिंदू, आदरणीय भाईजी !! आणि सहृदयातून बोल निघतात…
समाजाचा शिरोबिंदू तुम्ही ग्रीष्मातील गुलमोहर वटवृक्षाची छाया तुमची असावी नित्य आम्हावर…














