धामणगांव बढ़े (हॅलो बुलढाणा) नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पान्हेरा खेडी यांच्या वतीने गेल्या १९ वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमांनी गणेश उत्सव साजरा केल्या जात आहे,नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ग्रामीण भागात लोककला संवर्धन, रक्तदान शिबिर, करिअर मार्गदर्शन, पारंपारिक वेशभूषा कार्यक्रम, आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, वृक्ष लागवड व संवर्धन, व्यसनमुक्ती, प्लास्टिक बंदी जागरूकता, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धा, परिसरातील पक्षांना पाणवठे बसविणे, ग्रामस्वच्छता, बालविवाह जागरूकता, विविध शासकीय योजनांची माहिती देणे अशा स्वरूपाचे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. मंडळाला २०१६ मध्ये शासनाचा तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ मध्ये आज २५ सप्टेंबर रोजी नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने रवींद्र नाट्य मंदिर वरळी मुंबई येथे बुलडाणा जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार नामदार श्री आशिष शेलार (माहिती व तंत्रज्ञान,संस्कृतिक कार्य ) व नामदार श्री मंगलप्रभात लोढा (कौशल्य विकास) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे, यावेळी पु ल देशपांडे कला अकादमीच्या अधिकारी कर्मचारी व राज्यभरातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
- Hellobuldana