spot_img
spot_img

‘पंखिडा ओ पंखिडा! ‘हॅलो बुलढाणा’ प्रस्तूत गरबा मोहत्सवाचे थाटात उद्घाटन! – तरुणींच्या प्रचंड प्रतिसादात आदिशक्तीचा जागर! – स्त्रीशक्तीचे व एकात्मतेचे दर्शन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सोमवार पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालीय… विविध ठिकाणी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातोय. नऊ दिवस देवीची आराधना,

जागरण, गरबा आणि दांडिया अशा अनेक कार्यक्रमांतून भक्तांचा उत्साह दिसून येतो. बुलढाणा शहरातही विष्णूवाडी येथील राजे लॉन येथे ‘हॅलो बुलढाणा’ व कायस्थ कॅटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गरबा फेस्टिवलचे उद्घाटन मोठ्या थाटात झाले आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे त्यांच्या पत्नी अर्पिता ताई शिंदे, चंद्रकांत बर्दे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर आणि कोरिओग्राफर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झालाय. विशेष म्हणजे या गरबा उत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, स्त्रीशक्तीचे व एकात्मतेचे दर्शन घडत आहे.

नवरात्री उत्सवात आता गरबा नृत्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रुपांची विधीवत पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडिया नृत्य प्रकाराची परंपरादेखील साजरी केली जाते.’हॅलो बुलढाणा’ व कायस्थ केटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त यांच्या पुढाकारात दरवर्षी तरुणींचा व महिलांचा गरबा दुर्गोत्सवात रंगत आणतोय. काल सोमवारी या गरबा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा जल्लोषात व भक्तीमय वातावरणात पार पडला.प्रारंभी ‘हॅलो बुलढाणा’, दैनिक जनसंचलन,सिटी न्यूज वृत्तवाहिनीचे संपादक जितेंद्र कायस्थ, ओम कायस्थ यांच्यासह मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. त्यानंतर आई जगदंबाची आरती करण्यात आली. याप्रसंगी आदिशक्तीचा उत्सव अधिक आनंददायी करण्यासाठी गरबा खेळण्यात आला.स्त्री रूपाचा सन्मान, पूजा आणि उत्सव असलेल्या या गरबा महोत्सवात लहान मुली, तरुणी आणि महिला गाण्यांच्या बोलावर थिरकल्या..
त्यामुळे या गरबा उत्सवाची धूम बुलढाणेकरांना अनुभवता आली.
आता नऊ दिवस हा गरबा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून आदिशक्तीचा जागर करण्यात येणार असल्याने नऊ दिवसही गरबा उत्सव रंगतदार होत जाणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!