spot_img
spot_img

मृत्यू झाल्यास ग्रामपंचायतमध्येच अंत्यविधी!

चिखली (हॅलो बुलढाणा) वाघापुर येथे गट नं. ५४ एफ क्लास मध्ये बौद्ध समाज हा उघड्यावर अंत्यविधी करीत असून,स्वतंत्र स्मशानभूमी बांधून न दिल्यास दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर ग्रामपंचायतमध्येच अंत्यविधी करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

तालुक्यात बौद्ध समाजात स्मशानभूमी संदर्भात अनेक गावात अडचणी आहे.पाऊस सुरु असताना खंडाळा मकरध्वज येथील बौद्ध व्यक्तीला दहन देण्यासाठी स्मशान भूमी नसल्यामुळे अडचण निर्माण झाली होती, त्या पाठोपाठच काही दिवस उलटत नाही तर चिखली पासून काही अंतरावर असलेले
मौजे वाघापूर येथिल बौद्ध बंधू भगिनी यांनी तहसील कार्यालय चिखली यांना मौजे वाघापुर येथे गट नं. ५४ एफ क्लास मध्ये बौद्ध समाज हा उघड्यावर अंत्यविधी करीत आहे. सदर एफ क्लास मध्ये बौद्ध समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी बांधून दिल्यास प्रेताची विटंबना होणार नाही, जर पावसाळ्यामध्ये मृत्यु झाल्यास प्रेताची विटंबना होऊ शकते,दहन करण्यासाठी स्मशानभूमी नाही सदर स्मशान भुमीचे वेळोवेळी ग्रामपंचायने ठराव दिले, परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. तरी बौद्ध समाजासाठी स्वतंत्र जागा आरक्षित करून त्यावर स्मशानभुमी बांधून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच स्मशान भुमीची स्वतंत्र ७/१२ मध्ये ०.२० आर जमिनीची नोंद करून देण्यात यावी.
सदर मागणी मान्य न झाल्यास व वरील मागणीची पुर्तता न झाल्यास ठराविक वेळेनंतर बौद्ध समाज बांधव बौद्ध समाजात मृत्यु झाल्यास प्रेताचा अंत्यविधी ग्रा.पं. कार्यालयात करेल तसेच सर्व बौद्ध बांधव हे स्मशानभुमीच्या खुल्या जागेत जावून लोकशाही मार्गाने आंदोलन करतील तरी सदरील बाब हि अत्यंत तापदायक व कुणाला त्रासदायक होऊ नये याचा विचार करून स्मशानभूमीचे बांधकाम करून देणे व स्वतंत्र बौद्ध स्मशानभुमी म्हणून गट नं. ५४ एफ क्लास मध्ये नोंद करून देने हि निवेदनात विनंती समज बांधवानी केलेली आहे. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देताना वंचित तालुका अध्यक्ष संजय धुरंधर, शहर अध्यक्ष बाळू भिसे, सचिव जितु निकाळजे, गुलाबराव साळवे, संजय भिसे, दिपक साळवे, समाधान साळवे, राहुल साळवे, दुर्गाबाई इंगळे, संपत वाघ, विवेक साळवे सह समजतील अनेक जण उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!