spot_img
spot_img

आरटीओ कार्यालायातील वाद – आरोपींना अटकपूर्व जामीन

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) आरटीओ कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा व विनयभंगाचा खळबळजनक प्रकार घडल्यानंतर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपींना अखेर दिलासा मिळाला आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आणि आरटीओ एजंट यांच्यात वाहन तपासणीदरम्यान झालेल्या वादातून आरोपींविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात कलम ७४, १३२, ३५२, ११५(२), ३५१(२), १२१(१), २९६(अ), ३(५) बिएनएस अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गंभीर कलमांमुळे आरोपींवर कारवाईची तलवार लटकत होती.

आरोपींच्या वतीने अॅड. श्रीवेद प्र. इंगळे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. १५ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत त्यांनी आरोपींना खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याचा प्रभावी युक्तिवाद मांडला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या निर्णयामुळे आरटीओ कार्यालयातील वाढती दादागिरी, सरकारी कामकाजात व्यत्यय आणि अधिकाऱ्यांविरोधातील वाद पुन्हा चर्चेत आले आहेत. घटनेमुळे आरटीओ कार्यालयातील कारभार व एजंटांमधील सुरू असलेल्या संघर्षाचे चित्र उघड झाले असून, न्यायालयाच्या निर्णयामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!