spot_img
spot_img

💥BREAKING चिखलीत आमदाराच्या गाडीने युवकाला उडवले; गंभीर जखमी कोमात!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सैय्यद साहिल)  राजकारण्यांच्या गाड्यांचा बेफाम वेग पुन्हा एकदा निष्पाप नागरिकाच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. अमरावती विभागाचे शिक्षण आमदार किरण सरनाईक (रा. वाशीम) यांच्या इनोव्हा गाडीने पायी जाणाऱ्या कृष्णा नंदू लष्कर (वय 25, रा. गौरक्षण वाडी चिखली) या तरुणास पानगोळे हॉस्पिटलसमोर उडवले. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात कृष्णा गंभीर जखमी होऊन सध्या कोमात असून त्याला तातडीने जवंजाळ हॉस्पिटल, चिखली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेच्या वेळी आमदार सरनाईक हे बुलढाण्यातील डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी जात होते. घटनेनंतर आमदार सरनाईक यांनी स्वतः जखमी युवकास गाडीत टाकून जवंजाळ हॉस्पिटल येथे दाखल केले, मात्र घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.नागरिकांनी अशा घटना रोखण्यासाठी आमदार व अधिकाऱ्यांनी गाड्यांचा वेग मर्यादित ठेवावा आणि अपघातग्रस्तांसाठी जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली आहे. सध्या पोलीस पंचनामा करत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!